By  
on  

गौतमी-मृण्मयी यांच्यात कोण आहे चप्पलचोर ; देशपांडे बहिणींचा नवीन व्हिडिओ चर्चेत

गौतमी आणि मृण्मयी देशपांडे या बहिणी बहिणी सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतात. मृण्मयी आणि गौतमी हे त्यांचे धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत असतात आणि त्यांचे चाहते देखील त्यांची मजामस्ती छान एन्जॉय करतात. नुकताच या दोघींचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला असून या व्हिडिओत देशपांडे सिस्टर्समध्ये चपलेवरून गोड भांडण झाल्याचं दिसत आहे.

दरम्यान या व्हिडिओतअसे दिसत आहे की, मृण्मयीचा चपलेचा जोड परत द्यायला गौतमी नकार देत होती तर मृण्मयीने शक्कल लढवत तिच्या पायातून एक चप्पल आपल्या पायात काढून घेतली आणि आता दुसऱ्या पायातली चप्पल मात्र वेगळी आहे असं दोघींच्याही बाबतीत झालं आहे. त्यामुळे एका चपलेचा एक जोड एका पायात आणि दुसऱ्याचा एक जोड असा मिसमॅच अवतार करून दोघी मॉलमध्ये फिरताना दिसत आहेत. मृण्मयीच्या या अश्या वागण्याने गौतमी मात्र नाराज झालेली दिसत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओखाली मृण्मयीने 'भांडा पण नांदा' असं गोड कॅप्शन देखील दिलं आहे. दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना देखील भलताच आवडला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive