By  
on  

'हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी जाताना दिसतोय' म्हणत अभिनेता सुमित राघवनचं नवीन ट्विट चर्चेत

अभिनेता सुमित राघवन हा एक अभिनेता असण्यासोबतचं तो गाणं देखील गातो. याचदरम्यान तो अनेक सामाजिक आणि राजकिय परिस्थितींवर त्याची मतं मांडत असतो. नुकतंच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन हे सिनेमे रिलीज झाले. याचा परिणाम मराठी सिनेमांवर होत त्यांना थिएटर मिळत नसल्याची नाराजी सुमितने व्यक्त केली आहे.

सुमितने ट्विट करत म्हटले आहे की, "काल आमच्या चित्रपटावरच्या एका पोस्ट मध्ये एक वाक्य लिहिलं होतं की "जिथे पिकतं तिथे विकत नाही". आज एक आठवडा झाला #EkdaKaayZala प्रदर्शित होऊन आणि मुंबईत जेमतेम ३ shows आहेत, एक ठाण्याला आहे, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकही शो नाहीये. हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी जाताना दिसतोय." असं सुमितने त्याच्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

दरम्यान सुमितच्या या मताला पाठिंबा दर्शवत दिग्दर्शक आणि संगीतकार सलील कुलकर्णी आणि मनसे नेते आणि निर्माते अमेय खोपकर यांनी देखील आमिर आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांना मराठी सिनेमे टक्कर देत असताना मराठी सिनेमांचे शोज कमी केले जात असल्याचा आरोप करत अमेय खोपकर यांनी हिंदी सिनेमांची ही मुजोरी सहन केली जाणार नाही असा इशारा देखील दिला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive