By  
on  

अंकुश चौधरीची पत्नी दीपाचं छोट्या पडद्यावर पुनरागमन ; शुभेच्छा देत अंकुश म्हणाला...

झी मराठीवर सध्या अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'तू चाल पुढे' ही मालिका. या मालिकेच्या माध्यमातून मराठीतली एक गुणी अभिनेत्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अभिनेत्री दीपा चौधरी तू चाल पुढे मालिकेच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दीपा परब हे नाव मराठी सिनेसृष्टीला तसं नवीन नाही, पण दिपाच्या या कमबॅकवर चाहते भलतेच खुश झाले असून नवरा अंकुश चौधरीने सुद्धा तिच्या कमबॅकवर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता अंकुश चौधरीने त्याची प्रतिक्रिया देताना असे म्हटले की, "तू चाल पुढेचं कथानक मला कळलं तेव्हा ते मला फारचं आवडलं. यावर दिपाने उत्तमरित्या करू शकते असं मी तिला सांगितलं. दीपामध्ये ही भूमिका करून दाखवण्याची क्षमता आहे तर तिने ती वाया घालवू नये.' असं अंकुशने म्हटलं.

दरम्यान 'तू चाल पुढं' मालिकेतील दीपा परबची भूमिका सगळ्या गृहिणींच्या जवळची असून एखादी गृहिणी संसारासोबत स्वतःची स्वप्ने सुद्धा पूर्ण करू शकते, अशा कथानकावर आधारित ही मालिका आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive