By  
on  

राणादा पाठक बाईंच्या केळवणाचे फोटो आले समोर, सुरु झाली लगीनघाई

तुझ्यात जीव रंगला म्हणत पाठकबाई आणि राणा दा यांनी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ख-या आयुष्यात साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. टीव्हीवरची ही लोकप्रिय जोडी आता रिअल लाईफमध्येसुध्दा लग्नबंधनात अडकतेय. अक्षया देवधरने घराघरांमध्ये पाठक बाईच्या नावाने एक वेगळी ओळख निर्माण केली. तर रांगडा राणादा म्हणून अभिनेता हाप्दिक जोशी प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. 

दोघंही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. आपल्या आयुष्यातील अनेक  अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहचवतात. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकतेय, त्यामुळे त्यांच्या लग्नाची चाहत्यांना बरीच उत्सुकता आहे.  त्यांच्या वेडिंग डेटबद्दल कोणताही अपडेट समोर आलेला नाही. पण या जोडीच्या लगीनघाईला सुरुवात झाल्याचं मात्र समोर आलं आहे. हार्दिक आणि अक्षया यांचं पहिलं वहिलं केळवण आज पार पडलं असून अक्षयाने याबद्दल फोटो शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे.

अक्षया आणि हार्दिक यांचं केळवण कोकणात पार पडलं असून दोघेही यावेळी पारंपरिक लुकमध्ये दिसून आले. हार्दिक निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये तर अक्षया निळ्या साडीमध्ये दिसून आली. 

चाहत्यांनी अहा च्या या फोटोंवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive