By  
on  

असा रंगला 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीच्या हळदी आणि मेहंदीचा सोहळा ; पाहा फोटोस

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये दुबईत असताना अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडला होता. लॉकडाऊनमुळे फार कमी लोकांना तिच्या लग्नाला उपस्थित राहता आले होते. 

दरम्यान सोनालीने तिच्या लग्नाचे, मेहंदीचे आणि हळदीचे खास फोटो सोशल मीडियावर शेयर करत तिच्या चाहत्यांना लग्नाची खास झलक दाखवली आहे.

हळदीचे फोटो शेअर करत सोनालीने कॅप्शनमध्ये, 'खूप मजा, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, संगीत..' असं लिहिलं आहे. लंडनमध्ये पार पडलेल्या हळदीच्या कार्यक्रमाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

हळदीच्या फोटोंनंतर सोनालीचे मेहेंदीचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मेहेंदीचे फोटो शेअर करत सोनालीने कॅप्शनमध्ये, 'मेहेंदी लूक सर्वात जास्त खास आहे...' असं लिहिलं आहे.

 अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली-कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते.

त्यामुळे सोनालीचे लग्न कसे झाले, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. 

सोनाली कुलकर्णीने शेयर केलेल्या या  फोटोसमुळे सोनालीच्या लग्नाचा थाटमाट तिच्या चाहत्यांना अनुभवायला मिळत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive