By  
on  

अभिनेता सिद्धार्थ जाधव आठ दिवसांपासून रुग्णालयात ; स्वतः पोस्ट शेयर करत दिली बातमी

मराठीतला एनर्जीटीक अभिनेता म्हणून ज्याचं नाव समोर येतं तो म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधव. मात्र गेले आठ दिवस तो रुग्णालयात दाखल होता. आता त्याची परिस्थिती बरी असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सिद्धार्थने स्वतः एक पोस्ट शेयर करत त्याच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. सिद्धार्थने शेयर केलेल्या पोस्ट मध्ये त्याने रुग्णालयातील एक फोटो शेयर केला आहे. सोबतच त्याने एक मोठे कॅप्शन दिले आहे.

सिद्धार्थ त्याच्या पोस्ट मध्ये म्हणतो, "नमस्कार .... गेला आठवडाभर मी हिंदुजा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो.. आज घरी आलो... मनापासून आभार हिंदुजा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे.. खुप मनापासुन काळजी घेतली माझी... अभिनव महाडीक दादा आणि त्यांची संपूर्ण टिम... एका फोन वर नेहमीच धावून येणारे अमेय खोपकर दादा ....शशांक नागवेकर दादा.. लव्ह यू अलवेज..
पुढे तो म्हणतो, 'सतीश राजवाडे दादा आणि स्टार प्रवाह परिवार तुमचा पाठिंबा खुुप महत्त्वाचा होता..... आणि माझा मोठा भाऊ डॉ. लवेश जाधव जो रात्रभर जागून माझी काळजी घेत होता.. मी बरा व्हावा म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं.. त्यांना मनापासून धन्यवाद... आता हळूहळू बरा होतोय... खुप धावपळ असते आपली... पण त्यातही स्वतःच्या तब्येतीकडे कडे दुर्लक्ष होणार नाही याची कृपया काळजी घ्या...' सिद्धार्थला नेमकं काय झालं होतं, हे यात लिहिलं नसलं तरी त्याच्या या पोस्ट मुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.

'तमाशा लाईव्ह', 'दे धक्का २' या सिनेमांचे चित्रीकरण आणि त्यानंतर प्रोमोशन अश्या सगळ्या धावपळीत सिद्धार्थची तब्येत बिघडली असण्याचा अंदाज आहे. दरम्यान त्याच्या या पोस्टखाली सिद्धार्थच्या अनेक चाहत्यांनी तसेच इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्याला बरं होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive