By  
on  

ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांची खंत, वाचा सविस्तर

मराठी सिनेसृष्टीला हातभार लावणाऱ्या अनेक उत्तम कलाकारांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर होय. सतीश पुळेकर मराठी चित्रपट नाट्य सृष्टीत नायक, खलनायक, सहाय्यक तसेच दिग्दर्शकाच्या भूमिकेत झळकले आहेत. अनेक मालिका, चित्रपट तसेच नाटकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले. 

दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना वेळ पाळणे आणि जसं काम हवं तसं करून घेणे हे सतीश पुळेकरांच्या अंगवळणी पडलं. दरम्यान नाटक लिहिणे आणि दिग्दर्शन करणे त्यांना प्रचंड आवडू लागले. दिग्दर्शन करत असताना सतीश खूप कडक शिस्तीचे आहेत असा गैरसमज सर्वदूर पसरू लागला. त्यामुळे बहुतेकदा चांगल्या भूमिकेपासून, चांगल्या कामापासून त्यांना वंचित राहावे लागले. 

याचबरोबर घेतलेले काम अचानक सोडणे, भयंकर राग येणे तसेच एका सिनेमावेळी त्यांनी दिग्दर्शकाच्या कानाखाली वाजवली होती, यासारख्या अफवांमुळे कित्येक दिवस नव्हे तर महिनो नमहिने सतीश पुळेकर यांच्याकडे कुठलेच काम येत नसे. अगदी उत्कृष्ट दिग्दर्शन आणि अभिनयाची पारितोषिक मिळवूनही कसलंच काम नसायचे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive