By  
on  

सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई सिनेमाचं पोस्टर रिलीज ; मुख्य भूमिकेत अभिनेता ओम भूतकर

नुकताच भारताने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला आणि या खास दिवसाचं औचित्य साधून दिग्दर्शक सुजय डहाकेनं त्याच्या आगामी 'श्यामची आई' या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केला. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या सिनेमाविषयी सर्वांनाच उत्सुकता होती.

सुजय डहाकेनं 'श्यामची आई' या सिनेमातील साने गुरुजींचा फर्स्ट लूक समोर आणणारं पोस्टर रिलीज केलं असून याआधी मुळशी पॅटर्न मध्ये खतरनाक भूमिका केलेला अभिनेता ओम भूतकर या सिनेमात 'साने गुरुजीं'ची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. 'श्यामची आई' या सिनेमाच्या निमित्तानं ओम भूतकरनं एक नवं आव्हान स्विकारलं आहे. यापूर्वी विविध नाटकांतून आणि सिनेमातून त्याने अनेक विविधांगी भूमिका केल्या आहेत.

'शाळा' 'आजोबा' आणि 'केसरी' यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे कि, 'भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि  चित्रपटाची घोषणा केल्याच्या अगदी एक वर्षानंतर, मी तुमच्यासमोर  आमच्या 'श्यामची आई' चित्रपटाचे पहिले पोस्टर सादर करत आहे.'

दरम्यान अनेक दर्जेदार आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमांची निर्मिती केल्यानंतर सुजय डहाके श्यामची आई सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला काय घेऊन येणार आहे आणि ओम भूतकरने आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा साने गुरुजींच्या भूमिकेत तो कसा दिसणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive