By  
on  

अमोल कोल्हेंच्या नावाने सोशल मीडियावर 'हा' गैरप्रकार सुरू ; अभिनेत्याने स्वतः सावध राहण्याची केली विनंती

सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटीजची सोशल मीडियावर अकाउंट्स आहेत. ज्याचा वापर करून सेलिब्रिटीज् त्यांच्या नवनवीन सिनेमांचं प्रोमोशन करतात. मात्र कधी त्यांच्या नावाचा गैरवापर करत या सोशल मीडियाचा गैरफायदा घेतला जातो. नुकतंच अभिनेते अमोल कोल्हे यांच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर पैसा उकलण्याचा प्रकार समोर आला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या नावाने फेक अकाऊंट सुरु असल्याचं सांगितलं. तसंच या अकाऊंटच्या माध्यमातून पैसे उकळण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे सावध राहा, असंही त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे. तसंच त्यांनी या अकाउंट बाबत कायदेशीर तक्रारही दाखल केली असल्याचं देखील म्हटलं आहे. 

अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियावरून ते त्यांची मते मांडत असतात, याशिवाय त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सची देखील माहिती देत असतात. दरम्यान त्यांच्या नावाने फेक अकाऊंट सुरु असून त्यातून जनतेची फसवणूक केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ याविषयीची माहिती लोकांना दिली.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive