अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात ; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By  
on  

मराठी-हिंदीतील अनेक सिनेमा, नाटक तसेच मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेली अभिनेत्री म्हणजे नेहा जोशी. नेहाने नुकतंच लगीनगाठ बांधल्याचे समोर आले आहे. नेहाने तिच्या लग्नाचे फोटोस सोशल मीडियावर शेयर केले आहेत. नेहाने अभिनेता ओमकार कुलकर्णी सोबत लगीनगाठ बांधली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Joshi (@joeneha)

अभिनेत्री नेहा जोशी ही अभिनेता ओमकार कुलकर्णीसोबत १६ ऑगस्ट रोजी खासगी सेरमनीत लग्नबेडीत अडकली. तिने लग्नाचा फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला आहे ज्यात अंतरपाट पकडलेला असून ती कॅमेऱ्याकडे पाहताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने 'आयुष्यातील नवीन भूमिका' असं म्हटलं आहे, तर आणखी एक फोटो शेअर करत तिने 'आयुष्यातील नवीन भूमिका' असं म्हटलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Joshi (@joeneha)

ओमकार कुलकर्णी हा लेखक, कवी आणि प्रसिद्ध अभिनेता देखील आहे. ओमकारने अनेक मालिकांमधून काम केले आहे. दरम्यान नेहाने शेयर केलेल्या या फोटोसवर चाहत्यांसह अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Recommended

Loading...
Share