By  
on  

'रूढ अर्थाने ज्याला हिरो म्हणलं जातं, तसं ह्याच्या पर्सनॅलिटीत कायबी नाय' ; किरण मानेंची प्रथमेश परब साठीची पोस्ट चर्चेत

'टाइमपास' सारख्या सिनेमामधून तरुणाईत लोकप्रिय झालेला कलाकार म्हणजे अभिनेता प्रथमेश परब. 'टाईमपास' मधल्या स्टायल आणि त्याच्या बोलीभाषेमुळे त्याने सर्वांना आपलंस केलं. नुकताच त्याचा 'टाईमपास ३' हा सिनेमा देखील येऊन गेला आणि त्यापाठोपाठ 'टकाटक २' देखील प्रदर्शित झाला आहे 

त्यामुळे सगळीकडेच नुसती प्रथमेश परबचीच हवा पाहायला मिळत आहे. इतक्यातच अभिनेते किरण माने यांनी देखील प्रथमेश परब विषयी एक पोस्ट लिहिली आहे. जी सध्या खूपच चर्चेत आहे. किरण माने यांची देखील 'टकाटक २' मध्ये छोटीशी भूमिका आहे, या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी प्रथमेशचं कौतुक करत एक पोस्ट लिहिली आहे.shared

किरण माने यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये असं म्हटलंय कि, , "टकाटक 2' मधी या पोरानं धम्माल उडवून दिलीय भावांनो! प्रथमेश परब ह्या पोराचं पयल्यापास्नंच मला लै लै लै कौतुक वाटतं. मी ह्याला मुंबैतल्या इंटर कॉलेज एकांकिका स्पर्धांपास्नं बघतोय. रूढ अर्थानं ज्याला पिच्चरचा 'हिरो' म्हन्लं जातं तसं ह्याच्या पर्सनॅलिटीत काय बी नाय. उलट रस्त्यावरनं फिरताना एखाद्या पोराला "अय् हिरोS, बाजूला सरक." असं म्हन्लं जातं, त्या टाईपमधी हे पोरगं येतं... आनि आजकाल तर मराठी फिल्म इंडस्ट्रीतबी उंच, गोऱ्यापान, देखन्या, बॉडीबिल्डर पोरांचं 'पीक' आलंय. तरीबी सोत्ताच्या हिमतीवर, अभिनयाच्या ताकदीवर, आत्मविश्वासावर, सगळ्या हँडसम हंक पोरास्नी अय् हिरो, बाजूला सरक." म्हनत, हे पोरगं 'हिरो' झालं ! एक नाय, दोन नाय चार-चार सुप्परडुप्पर हिट्ट पिच्चर दिले"

पुढे किरण माने म्हणतात, "प्रथमेश, भावा या पिच्चरच्या शुटिंग, प्रमोशनच्या निमित्तानं तुला जवळनं बघितलं आनि तुझं लैच कौतुक वाटलं. माझ्या करीयरमधी अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले लै हिरो बघितलेत मी. सिरीयलच्या दुनियेत तर असे पैशाला पन्नास असत्यात. म्हनून मी अशा पोरांपास्नं जरा फटकून लांब असतो. पन तू येगळाच निघालास. 'सुपरहिट' असूनबी तुझ्यात कनभरबी गर्व नाय. प्रमोशनला फिरताना 'सिनीयर' म्हनून सतत माझी काळजी घेनं... कुठलाबी कमीपना न मानता सोत्ताची खुर्ची मला बसायला देन्यापास्नं, सतत माझ्या चहापान्याची विचारपूस करनं ... कॅमेर्यापुढं तेवढ्याच एनर्जीनं, आत्मविश्वासानं वावरनं.. हे सगळंच सांगत होतं 'तू लंबी रेस का घोडा है!' लिख ले. आप्पुन ने भौत दुनिया देखेली है...आप्पुन का अंदाज़ा ग़लत होईच नै सकता... लब्यू" असं म्हणत किरण माने यांनी प्रथमेशचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive