By  
on  

मुक्ता बर्वेचं रंगभूमीवर कमबॅक ; नव्या नाटकाची केली घोषणा

मराठीतली चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेचं नाव अगदी अदबीने घेतलं जातं. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात अभिनय करत तिने तिच्या सहज आणि सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मुक्ता आणि नाटक हे समीकरण अगदी न तुटणार आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ती रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये सक्रिय होती. तिच्या तुफान गाजलेल्या ‘कोडमंत्र’ या नाटकानंतर मुक्ता आता नवीन कोणतं नाटक घेऊन येत आहे. नुकतेच मुक्ताने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

मुक्ता बर्वे पुन्हा एकदा नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येत आहे. 'चारचौघी' हे नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले होते. आता ‘चारचौघी’ नावाचं नाटक एका नव्या रुपात पुन्हा बघायला मिळणार असून मुक्ताने स्वतः याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तसेच या नव्या चारचौघी नाटकात 'चौघी' कोण असतील? असा प्रश्नही प्रेक्षकांना विचारला आहे. दरम्यान मुक्ताने शेयर केलेल्या या पोस्टरला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर अनेक चाहते मुक्ताला शुभेच्छा देत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive