By  
on  

अभिनेता हेमंत ढोमे म्हणतो, “तिकीट दर कमी असतील तर … ”

करोना काळाच्या दोन वर्षानंतर सर्वकाही आता सुरळीत सुरु आहे. मनोरंजन सृष्टीनेसुध्दा जोर धरला आहे. हिंदीसह मराठी सिनेमांच्या प्रदर्शनाची रांग लागली आहे. अनेक विषयांचे-धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यंदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी एकत्र येऊन २३ सप्टेंबर राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्याचं ठरवलं आहे. याच औचित्य साधून प्रेक्षकांनी कमीत कमी खर्चात चित्रपटांचा आनंद घेता यावा यासाठी ७५ रुपये तिकिटाची घोषणा करण्यात आली. यादिवशी कोणताही चित्रपट तुम्ही ७५ रुपयांमध्ये बघू शकतात. या संकल्पनेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच संकल्पनेवर अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे याने आपले मत व्यक्त केलंय. 

 

आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी ७५ रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्या नंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलीय! सगळीकडे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल!
म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात?
प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का?

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive