लतादीदींचा जीवनपट उलगडणारी डॉक्युमेंटरी, वाढदिवसानिमित्त झाली घोषणा

By  
on  

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला.लता मंगेशकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले.आपल्या गानकोकिळेच्या आवाजाची जादू तमाम भारतीयांच्या  हदयात तशीच राहील. 

राम, तुम्हारा चरित स्वयं ही काव्य है।
कोई कवि बन जाय, सहज संभाव्य है।

श्री मैथिलीशरण गुप्त यांच्या या काव्यपंक्ती प्रमाणे लतादीदी या भारतीय संगीताच्या ज्ञानेश्वरी आहेत, या ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा मनपूर्वक निर्मळ प्रयत्न आहे. 

लतादीदींचा जीवनपट उलगडणारी ही डॉक्युमेंटरी असणार आहे.  मराठीतील  अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

एल एम म्युझिकचे सीईओ - संगीतकार मयुरेश पै आणि ख्यातनाम निर्माते नरेंद्र फिरोदिया या दोघांनी हे शिवधनुष्य उचललेलं आहे. ही डॉक्युमेंट्री मयुरेश पै दिग्दर्शित करत आहेत.

स्वरसम्राज्ञीला या कलाकृतीतून मानाचा मुजरा  करण्याचा हा प्रयत्न आहे.

Recommended

Loading...
Share