अमृता खानविलकर म्हणतेय 'अक्काल येऊ दे'?, पाहा हा Video

By  
on  

सध्या झलक दिख ला जाच्या मंजावर आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी लाडकी चंद्रमुखी म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.  एका नव्या युट्यूब व्हिडिओमुळे अमृता चर्चेता विषय  ठरते आहे. या व्हिडिओमध्ये अमृताने चक्क भारूड सादर केलं आहे. नारीशक्तिची जाणीव करून देणारे हे भारूड अभिनेत्रीने तिच्या 'अमृतकला' या हॅशटॅगअंतर्गत शेअर केले आहे. नवरात्रीनिमित्त तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

'अगं ग ग ग ग अक्काल येऊ दे, अगं ग ग ग ग अद्दल घडू दे' असे बोल असणारे हे भारूड स्त्रीला कमी समजणा-यांसाठी चपराक ठरतंय. 

 

 या व्हिडीओचं  दिग्दर्शन अभिनेता आदिनाथ कोठारे याने केलं आहे. सोशल मीडियावर अमृताच्या या व्हिडिओचं कौतुक करत आहेत. युट्यूबसह इन्स्टाग्रामवरही तिने चाहत्यांकडून खुप प्रशंसा मिळवलीय. 

Recommended

Loading...
Share