बिग बींनी शेयर केला श्रेयस तळपदेच्या 'आपडी-थापडी'चा ट्रेलर

By  
on  

महानायक अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांनी आपडी थापडी या चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरद्वारे शेअर करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. चित्रपटाचे संगीतकार रोहन विनायक आणि संगीत दिग्दर्शकांचा उल्लेख करत अमिताभ बच्चन यांनी थेट मराठीतून शुभेच्छा दिल्या. आपडी थापडी  . हा चित्रपट ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 

 

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या 'आपडी थापडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. चित्रपटाचं संगीत आनंद भास्कर, हनीफ शेख आणि रोहन विनायक यांनी केलं आहे. या चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता आहे.  आता थेट अमिताभ बच्चन यांच्याकडून चित्रपटाला शुभेच्छा मिळाल्यामुळे चित्रपटाविषयीची चर्चा नक्कीच वाढली आहे. 

Recommended

Loading...
Share