By  
on  

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब करणार 'प्रेम प्रथा धुमशान'

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब आता "प्रेम प्रथा धुमशान" या चित्रपटात दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिजित मोहन वारंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, 'प्रेम प्रथा धुमशान' या चित्रपटातून मालवणी बोलीत एक प्रेमकथा पहायला मिळणार आहे. २८ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर "प्रेम प्रथा धुमशान" चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजित वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजित वारंग यांच्या 'पिकासो' या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 'देजा वू' एकच अभिनेता असलेला अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते 'प्रेम प्रथा धुमशान' हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता आहे.

 'प्रेम प्रथा धुमशान' हा चित्रपट मालवणी बोलीभाषेतला आहे. शिवाली परब या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवालीनं महाराष्ट्राची हास्यजत्रातून विनोदी भूमिकांमध्ये आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे. पण आता चित्रपटातून तिचा सकस अभिनयही प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शिवालीबरोबर विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, अक्षता कांबळी, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे कलाकार आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, आनंद लुंकड यांना संगीत दिग्दर्शन केलं आहे.

मालवणी बोलीचा वापर चित्रपटात बहुतांशी विनोदनिर्मितीसाठी केला गेला. पूर्ण मालवणी बोलीतले चित्रपट अगदीच मोजके आहेत. मात्र मालवणी बोलीला, तिथल्या माणसांना आणि त्यांच्या गोष्टींना वेगळ्या उंचीवर घेऊन जात अभिजित वारंग यांनी 'प्रेमप्रथा धुमशान' चित्रपटातून अनोखी प्रेमकथा मांडली आहे. त्यामुळे आता वेगळं, आशयपूर्ण चित्रपटाचा आस्वाद घेण्यासाठी 'प्रेम प्रथा धुमशान' चित्रपटगृहात जाऊनच पाहायला हवा.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive