By  
on  

या मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, सोशल मिडीयावर शेयर केला फोटो

मराठी सिनेसृष्टीतही आता लग्नाचे वारे वाहू लागले आहे. अनेक सेलिब्रिटी लवकरच लग्नबंधनात अडकतायत. नुकतंच एका प्रसिध्द अभिनेत्रीने आपल्या साखरपुड्याचा फोटो सोशल मिडीयावर शेयर केला आहे. मराठीसोबतच दाक्षिणात्य आणि हिंदीत आपल्या अभिनयाचा तडका लावणारी भाग्यश्री मोटेचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे.  भाग्यश्री मोटे हिने विजय पालांडे बरोबर साखरपुडा केला आहे. गेली काही वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते.

बोल्ड आणि ब्युटिफुल भाग्यश्री सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. ती आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहते.. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिने आपल्या साखरपुडयाबद्दल माहिती दिली.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive