अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मिडीयावर सतत चर्चेत असते. प्राजक्ताला सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधून ब्रेक मिळाला आहे.ती एका सिनेमाच्या शूटींगसाठी लंडनला गेली होती. यात वैभव तत्ववादीसोबत ती स्क्रीन शेयर करतेय,या लंडनवारीचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळाले. पण नुकतंच भारतात परत आल्यावर तिने आणखी एक मसाालेदार पोस्ट केलीय.
परदेशात मसाल्यांशिवाय जेवण असतं. आपण फार काळ ते सहन करु शकत नाही. अलंच काहीसं प्राजक्ताचं झालंय. तिनेसुध्दा भारतात परत आल्यावर आपल्या अस्सल मराठमोळ्या जेवणावर आडवा हात मारलाय. ती म्हणते, परतल्यावर भूकेचे (तिखट, चमचमीत जेवणाचे) डोहाळे लागलेत…
.
सध्या मी हे खातेय..
(तरी भूकेच्या भरात सगळीकडे फोटोज् नाही काढले…)
Diet गेलं तेल लावत…
प्राजक्ताने खरंच पदार्थांवर आडवा हात मारल्याचं या फोटोंवरुन सिध्द होतंय, खरं पण चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर दिलेल्या प्रतिक्रीयासुध्दा भन्नाट आहेत.
तुम्ही सांगितल म्हणून आम्ही हेल्दी फूड आणि योगा सुरू केला आणि तुम्हीच आता चमचमीत पदार्थ खातय . आम्हाला ही आता एखादा cheat day meal घ्यावा लागेल...तर एक जण म्हणतंय, एवढं सगळं खाणार त्याला देव देणार.. तर काही म्हणतायत, किती पन खाल्लं तरी आमची प्राजू पतली