मराठी सिनेसृष्टीत सध्या ऐतिहासिक सिनेमांची एक लाट उसळलीय. यात सध्या हर हर महादेव या मराठीसोबत बहुभाषांमध्ये प्रदर्शित होणा-या भव्ययदिव्य ऐतिहासिक सिनेमाची खुप चर्चा रंगलीय. अभिनेता सुबोध भावे यात शिवछत्रपतींच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या करारी भूमिकेत पाहायला मिळतोय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या बांदलसेेनेच्या असामान्य पराक्रमाची शोर्यगाथा या सिनेमात पाहायला मिळतेय. त्याचीच ही झलक ट्रेलरमध्ये दिसली.
शरद पोंक्षे, मिलिंद शिंदे, किशेर कदम या मराठीतील ज्येष्ठ कलाकारांच्यासुध्दा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं पाहायला मिळतंय.
अभिजित देशपांडे लिखित दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सुबोध भावे, शरद केळकर यांच्यासह अमृता खानविलकर, हार्दिक जोशी, सायली संजीव हे कलाकार मुख्य भूमिकेत काम करताना दिसतील.
२५ ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू व कन्नड या पाच भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होईल.