By  
on  

'एकदम कडक' चित्रपटातील स्वीटीची सर्वत्र हवा, भाग्यश्री मोटे साकारणार स्वीटीची भूमिका

तरुणाईला पसंतीस पडणाऱ्या एका नव्याकोऱ्या आकर्षक, रोमॅंटिक, संघर्षमय, आशयघन अशा 'एकदम कडक' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले, मात्र त्या पोस्टरवरील मुलं पाहत असणारी मुलगी नक्की कोण आहे, या चर्चेला उधाण आले होते, आता मात्र या चर्चेला पूर्णविराम देत पोस्टरवरील ग्लॅमरस चेहरा साऱ्या तरुणाईच्या दिलाचा ठेका चुकवायला सज्ज झाला आहे, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या मॉडर्न फोटोशूटने बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही मागे टाकणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री भाग्यश्री मोटे आहे. भाग्यश्री तिच्या निरनिराळ्या फोटोशूटमुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. आता मात्र एका वेगळ्या धाटणीच्या 'एकदम कडक' चित्रपटातून भाग्यश्री एकदम कडक भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

भाग्यश्रीने या चित्रपटात स्वीटी ही भूमिका साकारली आहे. स्वीटीची भूमिका ही रोमँटिक आणि आकर्षक आहे, असे असले तरी अत्यंत संस्कारी, सोज्वळ मनाच्या या स्वीटीचे आकर्षक राहण्यामागे सुद्धा एक रहस्य आहे, जे येत्या 2 डिसेंबरला सर्वांनाच उलगडेल. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'एकदम कडक' या चित्रपटात अभिनेता पार्थ भालेराव, चिन्मय संत तसेच सैराट फेम तानाजी गलगुंडे व अरबाज हा तरुण कलाकारांचा ग्रुप धुडगूस घालणार असून भाग्यश्रीची ही दमदार एंट्री चित्रपटात पाहणे रंजक ठरणार आहे. 

'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व.नरेंद्र भिडे, पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. तर सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सायली पंकज, सौरभ साळुंके यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात चित्रपटातील गाणी सुरबद्ध केली आहेत. तर चित्रपटातील गीत मंगेश कांगणे यांचे आहे. संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार बाबा लाड यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तर चित्रपटाच्या संकलनाची बाजू आनंद कामत, संदीप जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी उत्तमरित्या पेलवली आहे.    

'एकदम कडक' चित्रपटाच्या एका मागोमाग एक एकदम कडक अशा पोस्टर्सने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आता मात्र प्रेक्षकांमधील ही उत्सुकता अधिक ताणली न जाता येत्या २ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive