By  
on  

टिकलीवरून ट्रोल करणाऱ्यांना आर्या आंबेकरनं दिलं सडेतोड उत्तर

मराठी सिनेसृष्टीतली गोड गोजिरी गायिका आणि अभिनेत्री म्हणून आर्या आंबेकर हे नाव आग्रहानं घेतलं जातं. आर्या आपल्या गाण्यांप्रमाणेच सोशल मिडीयावरसुध्दा नेहमीच चर्चेत असते. आपल्या आयुष्यातील अनेक अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेयर करते. नुकतंच तिच्या एका फोटोमुळे तिला ट्रोल करण्यात आलंय. पण तीसुध्दा गप्प बसली नाही तिने ट्रोलरला सणसणीत उत्तर देत त्याचं तोंड गप्प केलं आहे. 

सध्या दिवाळीचा सर्वत्र उत्साह आहे. सगळेच जण नटून-थटून आपले छान छान फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत. आर्याआंबेकरने दिवाळी निमित्त शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्समधून पसंती आणि प्रेम दर्शवलं असलं  असलं तरी काहींनी मात्र तिला साडी नेसल्यावर टिकली का नाही लावली असं म्हणत ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

एका  युजरने आर्याच्या फोटोवर कमेंट करताना, “खूप खूप सुंदर.पण कुंकू लावायची विसरली की काही वेगळं मनात विचार आला आहे.” अशी कमेंट केली होती. त्यावर आर्याने सडेतोड उत्तर दिलं आहे.

आर्याने युजरच्या कमेंटवर उत्तर देताना लिहिलं, “टिकली लावली आहे. कृपया झूम करून बघा. मी वेस्टर्न वन पीस घातला तरीही त्यावर काळी छोटी टिकली लावते. कृपया नीट बघून मग कमेंट करा. त्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका.” 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive