By  
on  

रितेश-जिनिलियाचा पहिला मराठी सिनेमा 'वेड'चं पोस्टर पाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला

२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .मुंबई फिल्म कंपनी ने आज  ६ व्या मराठी चित्रपटाची घोषणा केली . या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख करणार आहेत तसेच विशेष बाब म्हणजे  या चित्रपटा द्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत

रितेशने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. दिवाळी आणि पाडव्याच्या मुहूर्तावर हे पोस्टर रिलीज करताना फार आनंद होत असल्याचंही रितेशने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. पोस्टरवरुन हा चित्रपट प्रेम कहाणी आणि थ्रिलर या पठडीतला असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या नवीन चित्रपटाच्या फर्स्ट लूकवर लाईक्स आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

येत्या ३० डिसेंबरला रितेश-जिनिलियाचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेता सलमान खानही या सिनेमात खास भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

 

 

अभिनेत्री  जिया शंकर  या चित्रपटात भूमिका साकारत आहेत . आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहे . आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा मुंबई फिल्म कंपनी ने सोशल मीडियावर केली.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive