By  
on  

‘बिग बॉस मराठी’ फेम मीरा जगन्नाथची पोलिसांत तक्रार, म्हणते "माझ्याविषयी घाणेरड्या अफवा पसरवल्या जातायत"

सध्याचं जग हे सोशल मिडीयाचं जग आहे. इथे  प्रत्येक गोष्ट वा-यापेक्षाही जास्त वेगाने पसरवली जाते. ह्याचा सदुपयोगसुध्दा होतो तर कधी दुरुपयोगही. जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. असाच सोशल मिडीयाचा फटका बिग बॉस मराठी सीझन 3 फेम अभिनेत्री मीरा जग्गनाथला बसला आहे. काहीजणं सोशल मिडीयावरुन तिच्याबद्दल घाणेरड्या अफवा पसरवत असल्याचं तिचं म्हणणं आहे. भिनेत्री मीरा मीरा जगन्नाथने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिच्याबाबत घाणेरड्या अफवा पसरवणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. फक्त खडे बोल सुनावून मीरा गप्प बसली नाही तर तिने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

मीराने सोशल मिडीयावर समाजकंटकांविरोधात एक स्टोरीसुध्दा अपलोड केली आहे. ती लिहते, “सोशल मीडियावर एखाद्या विषयी घाणेरड्या अफवा पसरवून त्यांच्या विषयी लोकांना चुकीची माहिती देणे आणि पर्यायाने त्यांची मानहानी करणे हा कायद्याने शिक्षेस पात्र गुन्हा आहे. जो काही समाजकंटक आता माझ्या विरोधात करत आहेत. आपल्याला जर अशा पद्धतीचे काही मॅसेज किंवा पोस्ट दिसल्या तर कृपया अकाऊंट रिपोर्ट किंवा ब्लॉक करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. मुंबई पोलिस व सायबर पोलिस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. लवकरच गुन्हेगार पकडले जातील.” 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive