By  
on  

'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दुख:चा डोंगर; शेअर केली भावुक पोस्ट

आई कुठे काय करते फेम  अश्विनी महांगडे लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या मालिकेपूर्वी तिने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील राणू आक्का या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. ती सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या जवळच्या व्यक्तीचं म्हणजेच तिच्या भावाचं निधन झालं आहे. तिने भावासोबतचे अनेक फोटो आणि आठवणी सोशल मीडियावर शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे.  या भावना व्यक्त करताना अश्विनी अतिशय भावुक झाली आहे.  या जवळच्या व्यक्तीसाठी तिने लिहिलंय कि, ''खादा माणूस आपला असतो म्हणजे नेमकं काय? त्याच्या चांगल्या गोष्टी सोबतच वाईट गोष्टी स्वीकारणे म्हणजे असतो का आपला माणूस? प्रत्येक माणूस हा स्वतःचा असा प्रवास करत असतो. येणारे अनुभव आणि भेटणारी माणसं यावर त्याचा प्रवास ठरतो, ध्येय ठरते.''

पुढे तिने लिहिलंय कि, ''मंगेशची "दिदू" झाले पण कदाचित त्याला हवा असणारा वेळ देवू शकले नाही. बहीण म्हणून कमी पडलेच. आपला माणूस म्हणून त्याच्या चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पण वाईट गोष्टींसहित स्विकारता आलेच नाही कदाचित. माणूस निघून गेला की समजते की गेला तो माझा होता, त्याच्या जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाली, त्याला महत्व होते, मला अजून थोडा वेळ हवा होता, मी घेतले असते समजून...पण वेळ पुढे सरकलेला असतो. मंगेश.. आम्हाला थोडा वेळ दिला असता तर कदाचित आम्ही दोघांनी तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. मनावरचे ओझे जगू देईल का आम्हाला..''अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

मागच्या वर्षीच करोना काळात अश्विनीने आपल्या वडिलांना गमावलं.  या कठिण परिस्थितीतूनही तिने स्वत:ला सावरलं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive