मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि प्रसिध्द नृत्यांगना मानसी नाईक हिच्या अदाकारीवर चाहते नेहमीच फिदा असतात. मानसी नेहमीच तिच्या मोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करते.सोशल मिडीयावर मानसी नेहमीच सक्रीय असते. मागच्या वर्षीच मानसी लग्नबंधनात अडकली. पती परदीप खरेरा यांच्यासोबतचे अनेक रोमॅण्टिक व्हिडीओ आणि फोटोसुध्दा ती सतत चाहत्यांसोबत शेयर करायची. पण गेल्या काही दिवसांपासून असे व्हिडीओ-फोटो शेयर करणं सोडाच उलट तिने आपल्या लग्नाचे आणि इतर सगळे पतीसोबतचे फोटो-व्हिडीओ काढून टाकले आाहेत. त्यामुळेच मानसी पतीपासून विभक्त झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मानसी नाईक सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. मानसी नाईकच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा तिच्या वैवाहिक आयुष्यातील वादाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मानसी नाईक आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात.