मराठी मनोरंजनविश्वासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुझ्यात जीव रंगला या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत काम केलेली अभिनेत्री कल्याणी कुरळेचा अपघाती मृत्यू झाला आहे. कल्याणीचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
कल्याणीने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेसह अनेक मालिकांमधून अभिनय केला होता. कल्याणीने काही दिवसांपूर्वीच 'प्रेमाची भाकरी' नावाचे हाॅटेल सुरु केले होते. यावेळी हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिली आणि जागीच तिचा मृत्यू झाला.
तुझ्यात जीव रंगला फेम कोल्हापूरची अभिनेत्री कल्याणी जाधव हिच्या अपघाती निधनाची दुःखद बातमी कळली. या प्रसंगी आम्ही जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. कल्याणीच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
ओम शांती pic.twitter.com/O6RD88Vtob— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 13, 2022
चंद्रकात पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं की, “तुझ्यात जीव रंगला फेम कोल्हापूरची अभिनेत्री कल्याणी जाधव हिच्या अपघाती निधनाची दुःखद बातमी कळली. या प्रसंगी आम्ही जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. कल्याणीच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती.”