By  
on  

Children's Day Special : Disconnect to Reconnect संदेश देण्यासाठी मायरा सज्ज

सोशल नेटवर्किंग साईट्सवरच्या रील्स,स्टोरीज आणि 'तुझी माझी रेशीम गाठ' मधल्या 'परी'च्या भूमिकेतून  नेहमी प्रेक्षकांना भेटणाऱ्या मायरा वायकुळला पाहण्यासाठी जो-तो उत्सुक असतो. तर आपल्या सर्वांची लाडकी मायरा १४ नोव्हेंबर या  बालदिनानिमित्त 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातून भेटणार आहे. फक्त भेटणारच नाही; तर मोबाईल पोल्युशनवर भाष्य करणारा  Disconnect to Reconnect संदेश देणार आहे.  'परी' प्रमाणे मायराची  मोबाईल पोल्युशनद्वारे रिलेशनशिप बिल्डिंगवर भाष्य करणाऱ्या 'शॉर्ट फिल्म'मधली  'अनु' सुद्धा  लोकप्रिय होत आहे.  ही फिल्म 'कॉटन किंग'साठी अदभुत ( Adbhoot Creatives) ने तयार केली आहे. त्या फिल्मचं लेखन शाल्मली पेठे यांनी केले असून दिग्दर्शन वैभव पंडित यांनी केले आहे. तर कौशिक मराठे यांनी फिल्मची निर्मिती केली आहे.   

 

 

शाॅर्टफिल्म्स या नेहमीच प्रबोधनात्मक सामाजिक संदेश देण्यास उत्सुक असतात.  मोबाईल पोल्युशनवर भाष्य करणारी व्हायरल झालेली शाॅर्टफिल्मही त्याचं एक चालतं-बोलतं उदाहरण आहे. बालदिनानिमित्ताने मायरा मोबाईल पोल्युशनवर नेमका काय संदेश देणार आहे, हे पाहण्यासाठी  १४ नोव्हेंबर २०२२ ला सोमवारी रात्री ९.३० वाजता चला हवा येऊ द्या पाहण्यास विसरू नका.


 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive