By  
on  

लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सुनिल शेंडे यांचं निधन झालं आहे. ते 75 वर्षांचे होते. विलेपार्ले येथील राहत्या घरी सुनिल यांनी अखेरचा श्वास घेतला. चक्कर येऊन पडल्याने रक्तस्त्राव झाला आणि ते जागीच मरण पावल्याची माहिती आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुलं ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

मराठी सिनेमे, दुरदर्शनवरच्या अनेक हिंदी-मराठी मालिका, हिंदी सिनेमे यांतून सुनिल यांनी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. सुनील शेंडे यांनी सरफरोश, गांधी, वास्तव या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी ९० च्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘निवडुंग’ (१९८९), ‘मधुचंद्राची रात्र’ (१९८९), ‘जसा बाप तशी पोर’ (१९९१), ‘ईश्वर’ (१९८९), ‘नरसिम्हा’ (१९९१) या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive