पाहा Video : अप्सरा पंजाबमध्ये पतीसोबत चालवतेय ट्रॅक्टर

By  
on  

अवघ्या महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावते. तिचे असंख्य चाहते आहेत. सोनालीच्या प्रत्येक प्रोजेक्ट्सची जशी चाहत्यांना उत्सुकता असते तशीच तिच्या सोशल मिडीयावर ती शेयर करत असलेल्या नवनव्या फोटोशूटची असते. व्हिडीओंची असते. सोनाली मागच्याचवर्षी मे महिन्यात एनआरआय असलेल्या कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली. पतीसोबतचेसुध्दा अनेक रोमॅण्टिक फोटो ती सतत शेयर करत असते. नुकतंच सोनाली आणि तिचे कुटुंबिय पंजाबमध्ये आहेत. . तिने नुकतीच वाघा बॉर्डरलासुध्दा  भेट दिली आहे तसेच तिकडेच फोटो शेअर केलेत. 

सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती आपल्या नवऱ्याबरोबर शेतात ट्रॅक्टर चालवताना पाहायला मिळतेय . ‘घर की खेती.. गहू’ असं तिने कॅप्शनमध्ये लिहलं आहे. तसेच तिने लिहले आहे की तिच्या नवऱ्याला त्यांचे शेत बघण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही याचा आनंद घेत आहोत. सोनालीचा हा व्हिडीओ सध्या खुपच व्हायरल होत आहे. 

सोनालीची आई ही मूळची पंजाबी आहे. त्यामुळे पंजाबमधील त्यांच्या गावी हे सहकुटुंब एन्जॉय करतायत. 

Recommended

Loading...
Share