“मुलींनी जरा…” श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी अभिनेते शरद पोंक्षे यांची पोस्ट

By  
on  

सध्या संपूर्ण देश आणि महाराष्ट्र हा श्रध्दा वालकर या तरुणीच्या निर्घृण हत्येने हादरला आहे. वसईची 26 वर्षीय श्रध्दा वालकर ही तरुणी प्रियकर आफताब अमीन पूनावाला याच्यासोबत घरच्यांच्या विरोधात जाऊन दिल्लीत लिव्ह इन मध्ये रहात होती. तिने प्रियकर आफताब अमीन पूनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे.पोलिसांनी आरोपी पूनावाला याला अटक केली आहे. तसंच मृतदेहाचे काही तुकडे हाती लागल्याची माहिती दिली आहे.

क्रूरकर्मा आफताब आमीन पूनावाला याने मे महिन्यात श्रध्दाची हत्या केली. हत्या करत  इथवरच थांबला नाही तर त्याने प्रेयसीच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते तब्बल ६ महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे. पोलिस चौकशीत या सगळ्या भयावह गुन्ह्याची तिच्या प्रियकराने कबुली दिली आहे. ह्या भयंकर घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. यावर सर्वच स्तरांतून प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. मराठी सेलिब्रिटीसुध्दा व्यक्त होत आहेत. 

अभिनेते शरद पोंक्षे यांनीदेखील याविषयी खेद व्यक्त केला आहे.तसंच तरुणींना जागरुक राहण्याचं आवाहन करत आई-वडिलांचं ऐका असं वडिलधारी व्यक्ती म्हणून सल्लासुध्दा सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिला आहे. 

 

Recommended

Loading...
Share