मानसी नाईकची पतीच्या वाढदिवशी पोस्ट, “नातेसंबंध तोडण्यापूर्वी…”

By  
on  

मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक व पती प्रदीप खरेरा यांच्यात काहीच ऑल इज वेल नसल्याच्या चर्चांना काही दिवसांपासून उधाण आलं आहे. गच्या वर्षीच मानसी लग्नबंधनात अडकली. पती परदीप खरेरा यांच्यासोबतचे अनेक रोमॅण्टिक व्हिडीओ आणि फोटोसुध्दा ती सतत चाहत्यांसोबत शेयर करायची. पण गेल्या काही दिवसांपासून असे व्हिडीओ-फोटो शेयर करणं सोडाच उलट तिने आपल्या लग्नाचे आणि इतर सगळे पतीसोबतचे फोटो-व्हिडीओ काढून टाकले आाहेत. त्यामुळेच मानसी पतीपासून विभक्त झाल्याच्या चर्चां आहे. त्यातच ती सोशल मीडियावर विविध पोस्ट करताना दिसत आहे. त्यातच आता मानसी नाईकने तिच्या नात्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

मानसीने भावूक होत नुकतीच आपल्या नात्याबद्दल सूचक अशी कविता सोशल मिडीयावर पोस्ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या चर्चांना मानसी नाईक किंवा प्रदीपने कोणत्याही प्रकारचे उत्तर अद्याप दिलेले नव्हते.

मानसीने शेयर केलेली स्टोरी अशी आहे, “आज मी माझ्या मोबाईलमधल्या काही गोष्टी डिलीट करत होते, तेव्हा प्रत्येक वेळी फोन मला विचारत होता Are You Sure म्हणजे नक्की ना….!! मला मोठे आश्चर्य वाटले की एक निर्जीव मशीन आपल्या आत साठवलेल्या आठवणी काढून टाकण्यापूर्वी तुम्हाला नक्की ना असं विचारते. मग एक जिवंत माणूस ज्याला भावना आहेत, असे म्हटले जाते. इतका निष्काळजी व भावनाशून्य कसा राहतो. जो नातेसंबंध तोडण्यापूर्वी वा तोंड फिरवण्यापूर्वी स्वत:ला एकदाही विचारत नाही की Are You Sure म्हणजे नक्की ना !”, असे तिने या स्टोरीमध्ये म्हटले आहे.

 

 

मानसीने शेअर केलेली ही स्टोरी सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहत्यांना तिची ही स्टोरी वाचून धक्का बसला आहे. तिने शेअर केलेल्या या इन्स्टाग्राम स्टोरीचे तिच्या खासगी आयुष्याशी काही संबंध आहे का? असे अनेक तर्कवितर्क सध्या लावले जात आहेत. 

 

दरम्यान, मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात.  

 

Recommended

Loading...
Share