शरद पोंक्षेंच्या लेकीची गगनभरारी, अभिमानाने शेयर केला हा फोटो

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मिडीयावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. पण आता बाबा म्हणून शरद पोंक्षेंसाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांची लेक सिध्दीने नुकतीच गगनभरारी घेतलीय. म्हणजेच त्यांची लेक वैमानिक झाली आहे. 

शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी वैमानिक होण्याचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली होती. त्यावेळी त्यांनी सिद्धी परदेशात शिकण्यासाठी जात असताना विमानतळावरचे काही फोटो शेअर करत तिच्यासाठी एक भावूक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं लिहिलं होतं. आता तिचं ते स्वप्न पूर्ण झालं आहे.

नुकतीच ती एका प्रायव्हेट विमानाची पायलट झाली. ही आनंदाची बातमी शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर शेअर केली. सिद्धीचा एक फोटो आणि व्हिडिओ फेसबुकवर शेअर करत शरद पोंक्षे यांनी लिहिलं, “सिद्धी शरद पोंक्षे आज प्रायव्हेट पायलट झाली. असंख्य अडचणीतून मार्ग काढत ती इथपर्यंत पोहोचली. अभिनंदन सिद्धी…”

लेकीच्या उत्तुंग यशाने भारावलेले बाबा शरद पोंक्षे आता पाहायला मिळतायत. शरद पोंक्षेंच्या या पोस्टवर चोहोकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Recommended

Loading...
Share