नवाजुद्दीन सिध्दीकीच्या एका फोटोने सर्वत्र धुमाकूळ माजवला. तो म्हणजे त्याचा हड्डी सिनेमातला लुक. हिरव्या साडीत तो अगदी एखाद्या स्त्रीलाही लाजवेल इतका सुंदर दिसतोय. बॉलिवूडमध्ये येऊ घातलेल्या हड्डी या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी सिनेमात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. सिनेमातील नवजचा पहिला लुक समोर आला आहे. साडी चोळी, बांगड्या, मोकळे केस असा दुसरा लुक नुकताच समोर रिलीज झाला. नवाजुद्दीन सिद्धिकीनं सिनेमात प्रत्यक्षात 80 खऱ्या ट्रान्सजेंडरबरोबर काम केलं आहे. यातील एक ट्रान्सजेंडर म्हणजे गंगा असणार आहे.
मराठी मालिकेत पहिल्यांदा एक ट्रान्सजेंडरनं एंट्री घेतली. तो म्हणजे प्रणित हाट्टे. प्रणितनं मालिकेत गंगा हे पात्र साकारलं होतं. मालिकेत गंगा हे मध्यवर्ती पात्र असलं तरी गंगानं सर्वांचं लक्ष वेधलं होत. त्यानंतर गंगा म्हणजे प्रणित को होस्ट म्हणून युवा डान्सिंग क्विन या कार्यक्रमात दिसला. या कार्यक्रमातून गंगाची खरी कहाणी प्रेक्षकांसमोर आली. यानंतर आता गंगा आणि गंगासारख्या इतर ट्रान्सजेंडरची कहाणी मोठ्या पडद्यावर येणार आहे. टेलिव्हिजनवर काम केल्यानंतर गंगा थेट बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकीबरोबर दिसणार आहे. हड्डी या सिनेमातील गंगाचा पहिला लुक समोर आला आहे.