“…त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे”; मल्टिप्लेक्स चालकांना मनसेचा इशारा

By  
on  

मराठी सिनेमे आणि मल्टिप्लेक्स हा वाद नेहमीच पाहायला मिळालाय. उत्तमोत्तम मराठी सिनेमांना स्क्रीन्स मिळत नाहीत ही ओरड नेहमीच ऐकायला मिळालीय. मराठी सिनेमांनी आता गरुडझेप घेतली असली तरी अजूनही मल्टिप्लेक्समध्ये आपल्या सिनेमांची गळचेपी होते ती होतेच. काही दिवसांपूर्वी ‘गोदावरी’ आणि ‘सनी’ हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. ‘सनी’ चित्रपट तर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. पण अशातच मल्टिप्लेक्स चालक मात्र या चित्रपटाचे शो रद्द करत असल्याचं कल्याणमधून समोर आलंय. काही प्रेक्षकांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती. त्यानंतर सनी चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने ट्वीट करून संताप व्यक्त केला होता. आता याच मुद्द्यावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना चांगलाचा इशारा दिला आहे. 

 “आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘गोदावरी’ आणि प्रेक्षकांची चांगली गर्दी खेचत असलेला ‘सनी’ या दोन्ही चित्रपटांचे शोज सोमवारी कमी झाले, हे संतापजनक आणि दुर्दैवी आहे. लोकप्रिय आणि चांगल्या कलाकृतींना बळ देणं गरजेचं आहे. ‘सनी’ चित्रपटाला किती गर्दी होतेय, हे सोशल मीडियामधील व्हिडिओंमध्ये स्पष्टपणे दिसतंय. असं असूनही मल्टिप्लेक्सचालक नालायकपणा करतायत, म्हणूनच त्यांना पुन्हा धडा शिकविण्याची वेळ आली आहे,” असं अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.  

 

Recommended

Loading...
Share