By  
on  

राज ठाकरेंवर बायोपिक केला तर …राज यांच्या उत्तरावर तेजस्विनीलासुध्दा हसू आवरेना

‘अथांग’ वेबसिरीज या पिरीओडिक ड्रामाच्या ट्रेलर लॉंच नुकताच मुंबईत पार पडला. या ट्रेलर लॉंचचं विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खास मुलाखत. अथांग या वेबसिरीज निर्माती आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांची दिलखुलास मुलाखत घेतली. अनेक विषयांवर तिने राज यांना बोलतं केलं. मनोरंजनविश्वाबदद्ल त्यांनी आपलं मतसुध्दा यावेळी मांडलं . राज ठाकरे यांच्यावरच जर बायोपिक आला तर त्यात कोणता अभिनेता तुमच्या भूमिकेत चपखल बसेल, तसंच त्यात कोणता मेलोड्रामा पाहायला मिळेल याची त्यांनी अगदी मजेशीर उत्तरं दिली. 
 

तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांना “तुमच्या स्वतःच्या आयुष्यात एवढा ड्रामा आहे, त्यात राजकारण आहे, लव्हस्टोरी आणि आयुष्यातले इतर चढउतार आहेत तर मग तुमच्यावर जर बायोपिक निघाला तर तुमची भूमिका कोणी साकारलेली पाहायला तुम्हाला आवडेल?” असा प्रश्न विचारला. ज्यावर राज ठाकरे यांनी फारच धमाकेदार उत्तर दिलं. राज ठाकरे यांचं उत्तर ऐकल्यानंतर तेजस्विनीलाही हसू आवरेनासं झालं.
 

राज ठाकरे म्हणाले, “मला घरी जाऊन पहिलं बायकोला विचारावं लागेल, तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. मी पूर्वी जेव्हा सलूनमध्ये जायचो तेव्हा आजूबाजूला असलेल्या लोकांना पाहायचो आणि ते जेव्हा आरशात पाहायचे तेव्हा त्यांच्या स्वतःच्या दिसण्याबद्दल काही कल्पना असायच्या. तसं मला स्वतः कसा दिसतो हे आरसा सोडला तर मला माहीत नाही. त्यामुळे ती भूमिका कोण करू शकेल हे मला माहीत नाही.” यावर तेजस्विनीलाही हसू आवरेनासं झालं. त्यानंतर तिने राज ठाकरे यांना, “पण असा बायोपिक बनवायचा झाला तर आम्हाला तुम्ही ती संधी द्याल का?” असा प्रश्न विचारला ज्यावर ते म्हणाले, “तसं काही असे तर करा माझी काहीच हरकत नाही. पण काही नसेल तर कशाला उगाच करायचं काही.”
 

“तुमच्या आयुष्यात त्या सर्व गोष्टी आहेत ज्या एका बायोपिकसाठी आवश्यक आहेत.” असं स्पष्ट केलं. यावर राज ठाकरे त्वरीत म्हणाले, “आता माझी लव्हस्टोरी तुम्ही कुठून काढली माहीत नाही.” राज ठाकरे यांच्या बोलण्यावर तेजस्विनीने बायकोबरोबरची लव्हस्टोरी असं स्पष्टीकरण दिलं. त्यावर ते म्हणाले, “अच्छा तेच होतं का? मला वाटलं दुसरी कोणती लव्हस्टोरी जी मला माहीत नाही.”

 

 

 

राज ठाकरे पुढे म्हणाले, “आजकाल बायोपिकचं पेव फुटलंय. पण भारतात जर सर्वात बेस्ट बायोपिक जर कोणाचा होऊ शकत असेल तर तो इंदिरा गांधी यांचा आहे. त्यांचा सपूर्ण कार्यकाळ हा रोलरकोस्टर राइडसारखा आहे. एखाद्या बायोपिकसाठी व्यक्तिरेखेची निवड अगदी योग्य हवी. त्यामुळे माझ्यावर बायोपिक होऊ शकतो की नाही हे मला माहित नाही. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive