जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. , गेल्या 15 दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत, 9.30 वाजता हेल्थ बुलेटिन जारी केलं जाणार आहे. मात्र, काल बुधवार सायंकाळपासून त्यांच्या निधनाच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरल्या आहेत. काही माध्यमांमधील वृत्त आणि बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर गोखले यांच्या प्रकृतीबाबत उलटसूलट चर्चा सुरू झाली होती. पण ते सध्या लाईफ सपोर्टवर असल्याचं सांगण्यात येत आहे.
विक्रम गोखलेंच्या पत्नीने असेही नमूद केले की त्यांच्या पतीचे वय ७७ वर्षे आहे, कारण जवळपास सर्वच ठिकाणी त्यांचे वय ८२ सांगितले जात आहे. त्यांनी अशी माहिती दिली की त्यांची सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये राहणारी मुलगीही भारतात पोहोचली आहे, त्यांची दुसरी मुलगी मुंबईत राहते. या दोघीही पुण्यात दाखल झाल्या आहेत.