Video : रितेश देशमुखच्या 'वेड'चा आला टीझर, दिसली जिनिलिया देशमुखच्या व्यक्तिरेखेची झलक

By  
on  

अभिनेता रितेश देशमुख दिगदर्शित पहिला मराठी सिनेमा वेडचा उत्कंठावर्धक ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. येत्या 30 डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत . या पूर्वी जेनेलिया यांनी हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे .

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री  जिया शंकर इत्यादी कलाकार  या चित्रपटात भूमिका साकारत आहे. आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. तर या चित्रपटातील गीते अजय- अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. वेड चित्रपटाची पटकथा रुषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत. सिनेमॅटोग्राफी भूषणकुमार जैन यांनी केली आहे संकलनाची जबाबदारी चंदन अरोरा यांनी पार पाडली आहे. संदीप पाटील हे कार्यकारी निर्माते आहेत, जिनिलिया देशमुख यांनी वेड चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

अक्षय कुमारनेही रितेशच्या या सिनेमाचा टीझर शेयर केला आहे. तसंच खास मेसेज लिहून, म्हटलंय  " माझा भाऊ आणि ॲक्टर आता डिरेक्टर झालाय. त्याने दिग्दर्शीत केलेल्या पहिल्या मराठी सिनेमाचा टिझर पाहिला आणि खरंच सांगतो मला वेड लागलं.
तुम्हीही पहा तुम्हालाही लागेल….. वेड !" 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

यामुळेच वेड सिेनमाची उत्सुकता शिगेला पोहचलीय. 

Recommended

Loading...
Share