By  
on  

हिरवा चुडा, मेहंदी, गजरा आणि नथ पाठकबाईंचा नववधूंच्या रुपातला झक्कास व्हिडीओ!

'तुझ्यात जीव रंगला' फेम राणादा आणि पाठकबाई सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. टेलिव्हिजनवरची ही प्रसिध्द जोडी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. चाहत्यांना त्यांचा लग्नसोहळा पाहण्याची आणि लाडक्या अक्षया देवधरला  व हार्दिक जोशीला वधू-वरांच्या वेशात पाहण्याची बरीच उक्सुकता आहे. दरम्यान अक्षयाच्या एका व्हिडीओने ही उत्सुकता आणखी वाढलीय. 

अक्षया देवधर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “तुम्ही मला नववधूच्या वेशात पाहण्यासाठी उत्सुक आहात का?” असा प्रश्न तिने कॅप्शनद्वारे चाहत्यांना विचारला आहे.
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

 

 

 

अक्षयाच्या हातात हिरवा चुडाही पाहायला मिळत आहे. तसेच तिने छान मोत्याची नथही घातली आहे. याबरोबर तिच्या हातावर छान मेहंदीही रंगल्याचे दिसत आहे. तिने या पोशाखाला साजेसा मेकअप आणि हेअरस्टाईलही केली आहे. त्याबरोबर तिने केसात गजराही माळल्याचे दिसत आहे. 

काही दिवसांपासून त्यांच्या लग्नपत्रिकेचे फोटोही समोर येत आहे. मात्र त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आली नाही. मात्र तिच्या या व्हिडीओनंतर ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची हिंट मिळतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive