ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ छोट्या पडद्यावर विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सोशल मिडीयावरही त्या ब-याच सक्रीय असतात. 90 च्या काळात अशोक सराफ यांच्याबोरबर रुपेरी पडदा गाजवणा-या निवेदिता जोशी- सराफ आता प्रथमच वेबसिरीजमधून पदार्पण करतातयत.
निवेदिता सराफ या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये निवेदिता सराफ यांच्या डोक्यावर केस नसून डोळेही पाणावलेले दिसत आहेत. त्यांच्या या लूकची सोशल मीडियावरही बरीच चर्चा होताना दिसत आहे
निवेदिता सराफ ‘अथांग’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या वेब सीरिजमध्ये त्या ‘आऊ’ ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. अथांगमधील त्यांच्या लूकचा हा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या फोटोला “ही वेब सिरीज म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे. एक खूप वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. नक्की पहा किती गुपितं, किती रहस्य…” असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.