सिनेमा, नाटक आणि मालिका याचबरोबर हिंदी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. ते ७७ वर्षांचे होते. . त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि दोन कन्या असा परिवार आहे. विक्रम गोखले यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर सहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अलिकडेच प्रदर्शित झालेला आणि अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजवणारा गोदावरी ह्या सिनेमात नारुशंकर देशमुख ही व्यक्तिरेखा साकारुन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी काळजाला हात घातला.
गोदावरी या हदयस्पर्शी सिनेमात विक्रम गोखले यांचा फक्त एकच संवाद संपूर्ण सिनेमाभर होता. तो म्हणजे, " लागलं का पाणी मारुतीच्या पायाला"...स्मृतीभ्रंश झालेल्या वयोवृध्द कुटुंब प्रमुखाची अप्रतिम भूमिका त्यांनी साकारली होती. हा त्यांच्या कारकिर्दीतला अखेरचा सिनेमा ठरला.