आम्हा कलाकारांची संपूर्ण पिढी विक्रम गोखले यांना गुरुस्थानी मानते, लाखात एक असा कलाकार आम्ही गमावला - अश्विनी भावे

By  
on  

सिनेमा, नाटक आणि मालिका याचबरोबर हिंदी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड झाले.  त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. ते ७७ वर्षांचे होते. . त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि दोन कन्या असा परिवार आहे. विक्रम गोखले यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर सहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मराठी सिनेसृष्टीने एक दमदार कलाकार गमावल्याने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळलीय. विक्रम गोखले यांच्यासोबत वझीर, कळत-नकळत अशा सिनेमांमधून स्क्रीन शेयर करणा-या त्यांच्या सह्भिनेत्री अश्विनी भावे यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

अश्विनी भावे म्हणतात, " विक्रम गोखले म्हणजे अभिनयाची शाळा आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात मिळाली. पार्टनर या मालिकेच्यानिमित्ताने. आम्हा कलाकारांसाठी अत्यंत दुखद बातमी आहे. आम्हा कलाकारांची अख्खी पिढी घडवणारा लाखातला एक कलाकार आजा आम्ही गमावला आहे. कळत-नकळत आणि वझीर मधली माझी भूमिका खुलण्यामागे विक्रमजींचं खुप मोठं मार्गदर्शन होतं. ऑनस्क्रीनप्रमाणेच ते ऑफस्क्रीनसुध्दा एक सहहदयी माणूस होते."

 

Recommended

Loading...
Share