By  
on  

“मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो”… नाना पाटेकर यांची भावूक पोस्ट

सिनेमा, नाटक आणि मालिका याचबरोबर हिंदी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड झाले.  त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. ते ७७ वर्षांचे होते. . त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि दोन कन्या असा परिवार आहे. विक्रम गोखले यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर सहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

विक्रम गोखले यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली आहे.अभिनेते नाना पाटेकर यांनीदेखील त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून त्यांची हळहळ व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर नाना यांनी विक्रम गोखले यांच्याबरोबरचा एक छान फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये नाना यांनी लिहिले आहे, “विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो …..असेन…तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही….”

नाना यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. नाना पाटेकर यांनी ‘नटसम्राट’ या चित्रपटात गणपतराव बेलवलकर ही अजरामर भूमिका साकारली होती. नाटकावर बेतलेल्या या चित्रपटात नाना यांच्याबरोबर विक्रम गोखले यांची एक खास भूमिकाही आपल्याला पाहायला मिळाली होती. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive