हार्दिक-अक्षया पाठोपाठ हा अभिनेतासुध्दा चढला बोहल्यावर, पाहा Photo

By  
on  

तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेतील राणादा आणि पाठकबाई ही रील लाईफ जोडी आता रीअल लाईफ लग्नबंधनात अडकली आहे. या लोकप्रिय जोडीच्या लग्नाचे वेध सर्वांना खुप दिवसांपासूव लागले होेते. पुण्यातील  मेहंदी, हळद ते संगीत सेरेमनी पर्यंत सगळ्याच समारंभांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशात आता आणखी एक मराठमोळा अभिनेता विवाहबंधनात अडकला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हार्दिक आणि अक्षयाच्या पाठोपाठ अभिनेता आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले यांनीही गुपचूप लग्न उरकलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. विराजस कुलकर्णीने हे फोटो शेअर करताना ‘द कुलकर्णीज’ असं कॅप्शनही दिलं आहे.

आशयने माझा होशील ना आणि पाहिले न मी तुला या मालिकांमधून झळकला आहे. तसंच आशयची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला व्हिक्टोरिया हा सिनेमा या महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Recommended

Loading...
Share