Photos : राणादा आणि पाठकबाईंच्या शाही रिसेप्शनचे फोटो पाहा

By  
on  

राणादा आणि पाठकबाईंनी तुझ्यात जीव रंगला म्हटलं आणि ही रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येही आयुष्यभरासाठी एकमेकांची  झाली. हार्दिक जोशी-अक्षया देवधर २ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले.

 

कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकचं लग्न थाटामाटात पार पडलं. दोघांच्या लग्नाचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर वा-याच्या व्हायरल झाले आहेत.

 

 

अक्षया-हार्दिक यांची हळद, मेहंदी, संगीत आणि लग्नसोहळ्यापासून ते रिसेप्शनपर्यंतचे त्यांचे सर्व फोटो आणि अपडेट्स पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या . लग्नातील प्रत्येक अपडेट हे सेलिब्रिटी कपल आपल्या सोशल मिडीयावरुन चाहत्यांपर्यंत पोहचवत होते.

 

चाहते आणि कलाकार मंडळी या फोटोंवर अभिनंदनाचा  वर्षाव करत होते. अक्षया-हार्दिक यांच्या शाही लग्नसोहळ्याप्रमाणेच त्यांचा रिसेप्शन सोहळासुध्दा तितकाच दैदिप्यमान होता. 

 

रिसेप्शनसाठी अक्षया आणि हार्दिकने खास जांभळ्या रंगाचे मॅचिंग कपडे परिधान केले होते. यावेळी दोघेही खूप सुंदर दिसत होते.

त्यांच्या या जांभळ्या रंगाच्या आऊटफिट्सने सर्वांचंच लक्ष वेधलं.

दोघांनीही यावेळी आपल्या पालकांचे आशीर्वाद घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे

 

Recommended

Loading...
Share