सध्या ऑनलाइन प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या मनोरंजक चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. चित्रपटगृहात ‘धिंगाणा’ घातल्यानंतर आता ‘धिंगाणा’ हा मराठी धमाल चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’ वर पहायला मिळणार आहे. चीट फंड घोटाळ्यासारखा वेगळा विषय मांडणारा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’वर पहायला मिळणार आहे.
कोणत्याही गोष्टीचा मोह हा वाईट असतो. झटपट पैसे कमावण्याच्या नादात फसव्या स्किमला बळी पडणारे अनेकजण आपल्या अवतीभोवती पहातो. हाच धागा पकडून ‘धिंगाणा’ या चित्रपटात एका स्किममध्ये अडकलेलं गाव व त्यातून गावकऱ्यांना बाहेर काढणाऱ्या राजाराम या युवकाची धडपड दाखवली आहे. राजारामची ही धडपड यशस्वी होणार? की तोच या जाळ्यात अडकणार? याची धमाल मनोरंजक कथा म्हणजे ‘धिंगाणा’ हा चित्रपट.
समीर सदानंद पाटील निर्मित ‘धिंगाणा’ हा निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे. प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता हनमघर, अंशुमन विचारे, प्रकाश धोत्रे, सदानंद पाटील, श्वेता पाटील, स्वप्नील राजशेखर यांच्यासोबत रझा मुराद, अवतार गिल, शाहबाज खान, कुनिका सदानंद हे बॉलीवूडचे कलाकारही या चित्रपटात आहेत