By  
on  

रिक्षा, टॅक्सी मिळत नव्हती मग पुणेकर मुक्ता बर्वेने केला असा प्रवास, पाहा Photo

नाटक, मालिका, सिनेमा अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी चतुरस्त्र अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या नवनव्या प्रोजेक्टस्ची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. ती नेहमीच आपल्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांची मनं जिंकते. अलिकडेच तिचे वाय आणि आपपडी-थापडी हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.  सध्या चारचौघी हे तिचं नाटकं रंगभूमीवर खुप गाजतंय. 

मुळची पुणेकर असलेली मुक्ता कामानिमित्ताने मुंबईत वास्तव्यास आहे. नुकताच तिने मुंबईत बेस्ट बसने प्रवास केला आहे. त्याबद्दलची पोस्ट तिने शेअर केली आहे. बेस्ट बसमधला फोटो शेअर करत म्हणाली “जेव्हा रिक्षा टॅक्सी असे काहीच नसते तेव्हा बेस्ट ही बेस्ट,” असा कॅप्शन तिने दिला आहे. नेटकऱ्यांनी यावर कमेंट करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे “एकदम खरं आहे,” दुसऱ्याने लिहले आहे “अभिनेत्रीचे पाय अजून जमिनीवर आहेत.” अशा शब्दात तिचे कौतुक केले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

 

मुंबईत आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सीवाले नेहमीच नकार देतात, ह्याचा अनुभव सर्वांनाच आहे. सेलिब्रिटींनाही याची झळ पोहचलीय. त्यामुळे बेस्टच बेस्ट आहे , हाच संदेश मुक्तासुध्दा देतेय.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive