महाराष्ट्राची लाडकी चंद्रमुखी आपल्या तालावर सर्वांनाच नाचवते आणि आपल्या घयाळ करणा-या अदाकारीने व अभिनयाने वेड लावते. चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर ही आघाडीची मराठी अभिनेत्री सिनेसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही दिमाखात झळकते. अमृता सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेकत असते. नवनवे फोटोशूट, रील्स व्हिडीओ, फॅन्स सोबतची मस्ती असो किंवा आगामी सिनेमाचं प्रमोशन. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. अलिकडेच झलक दिख ला जा च्या 10 व्या सीझनमध्ये आपल्या डान्सच्या अदाकारीने तिने हिंदी प्रेक्षकांसह धक धक गर्ल माधुरीलासुध्दा वेड लावलं,
अमृतावर भरभरुन प्रेम करणा-या प्रेक्षकांसोबतच तिला ट्रोल करणारेसुध्दा अनेक जणं आहेत. नुकतीच अमृतानं एक पोस्ट शेअर केली आणि त्यावर आलेल्या एका युझरच्या कमेंटनं अमृता चांगलीच भडकली. तिनं थेट पोलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकी दिली आहे. अमृतानं इतकं मोठं पाऊल का उचललं जाणून घ्या.
अमृता ही देवभोळी आहे. तिची देवावर नितांत श्रध्दा आहे. अनेक मुलाखतींमध्ये तिच्यातील श्रध्दाळू व्यक्ती पाहायला मिळालीय. नुकतीच दत्त जयंती झाली. यानिमित्तानं अनेक जण दत्तगुरूंचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त करत होते. अमृता कितीही मॉडर्न असली तरी देवावार तिची नितांत श्रद्धा आहे. अमृतानं गुरूचरित्रातील काही ओळी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. त्यावरून तिची देवावरची श्रद्धा दिसली मात्र काहींनी तिला वाईट शब्दांत ट्रोल देखील केलं.
अमृताच्या या पोस्टवर एका युझरनं कमेंट करत म्हटलं, 'गुरूचरित्राबद्दल बोलायची लायकी नाही तुमची, शरिर दाखवणाऱ्यांनी याबद्दल बोलु नये'. त्यावर अमृतानं युझरला चांगलेच खडे बोल सुनावले. अमृतानं म्हटलं, 'कोण तुम्ही. असल्या भाषेत परत बोललात तर पोलिसांत तक्रार करेन कळलं? या बाबतीत कोणाचं उगीच ऐकून घेणार नाही'.
अमृताने युझरची केलेली ही कानउघडणी चांगलीच व्हायरल होतेय.