मराठी सिनेसृष्टीतले प्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे हे नेहमीच ज्वलंत विषयावर आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन भाष्य करतात. आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देतात. व्यक्त होतात. एकूणच काय तर केदार हे सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतात. पण नुकताच त्यांच्याबाबत एक अनुचित प्रकार घडला आहे आणि याची माहिती खुद्द त्यांनीच दिली आहे.
केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या चाहत्यांना फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे.
“नमस्कार, काल रात्री माझे फेसबुक अकाऊंट (पर्सनल आणि पेज) हॅक झाले असून आता त्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही… त्यामुळे जर या दोन्ही माध्यमांद्वारे तुमच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क किंवा संवाद साधला जात असेल तर कृपया सावध रहा आणि कोणत्याही प्रकारे रिप्लाय अथवा मेसेज करु नका! धन्यवाद!” अशी पोस्ट केदार शिंदे यांनी केली आहे.
केदार शिंदे यांच्या आगामी दोन सिनेमांची सर्वांना उत्सुकता आहे . ते म्हणजे 'महाराष्ट्र शाहीर' आणि 'बाईपण भारी देवा'.