प्रसिध्द लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री मेघा घाडगे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच मेघा बिग बॉस मराठी सीझन ४ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. मेघा सोशल मीडियावर कायमच विविध पोस्ट शेअर करत असते. आता ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचे हसतानाचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. याला तिने कॅप्शन दिले आहे. हे कॅप्शन खुप लक्षवेधी ठरतंय.
मेघा घाडगेची पोस्ट
“दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी होणारी आणि दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणारी माणस ही माणुस्कीची लक्षण असतात.
ती खरी माणसं, पण दुसऱ्यांच्या दुःखात, त्यांच्या अपयशात आनंदी होणारी आणि दुसऱ्यांच्या आनंदावर जळणारी माणस ही अघोरी आणि विकृत असतात .जे नाही स्वतः च भलं करत नाही कोणाच होऊ देत.
अशा बालिश विकृत लोकांसाठी कायम हसत रहा जी भर के… मी नेहमीच तुमच्यावर प्रेम केलंय म्हणून मी मी आहे ..!!” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.